वाकड येथील क्रोमा स्टोअर्स मधून अॅपल कंपनीचा महागडा मोबाईल चोरीला

0
1329

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – वाकड येथील क्रोमा स्टोअर्स मधून तब्बल ७९ हजार रुपायांचा अॅपल कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रवींद्र कालिदास क्षीरसागर (वय २९, रा. चिंतामणी कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी  वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील क्रोमा स्टोअर्समध्ये मोबाईल पाहण्यासाठी काही ग्राहक आले होते. त्यामध्ये मोबाईल चोर देखील दुकानात आला. दुकानात येताना त्याने कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे नाटक करुण तब्बल ७९ हजार रुपायांचा अॅपल कंपनीचा मोबाईल चोरुन नेला. दरम्यान चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली. वाकड पोलिस त्याआधारे चोराचा शोध घेत आहेत.