वाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग

0
2122

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) –  भाऊ-बहिण कार मधून जात असताना एकाने कार आडवी लावून भावाला हाताने मारहाण केली आणि बहिणीचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी (दि.१३) रात्री साडेअकाराच्या सुमारास वाकड ब्रिजखाली घडला.

याप्रकरणी ४५ वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, (एमएच/१२/एनजे/८२७२) या क्रमांकाच्या कारमधील अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४५ वर्षीय महिला आणि तिचा भाऊ गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या कार मधून  जात होते. वाकड ब्रिजखाली आल्यानंतर पाठीमागून आलेल्या (एमएच/१२/एनजे/८२७२) या क्रमांकाची कार त्यांच्या कारच्या आडवी लावण्यात आली. त्यामुळे त्यांनी कार थांबवली. या कार मधील चौघा आरोपींनी शिवीगाळ करत पीडित महिलेच्या भावास मारहाण केली. यावेळी पीडित महिला मधी पडली असता तिचा विनयभंग करून आरोपी फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करत आहेत.