वाकड पोलिसांव्दारे आयोजित सुरक्षा रक्षकांसाठीच्या मार्गदर्शन शिबीराला उत्सफूर्त प्रतिसाद

0
685

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – वाकड पोलिसांच्यावतीने सोमवार (दि.१) श्री.बालाजी सोसायटी मॅनेजमेंट कॉलेजच्या सभागृहात पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी सोसायटी आणि कंपन्यांमधील खाजगी सुरक्षा रक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाती वरिष्ठ पोलीस अधिकारी, हिंजवडी आणि वाकड परिसरातील ३०० सोसायटींचे चेअरमन आणि सचिव तसेच ५० खाजगी सुरक्षा संस्थांकडील ५०० सुरक्षा रक्षक उपस्थि होते. शिबीरामध्ये सुरक्षारक्षकांना मालमत्तेची सुरक्षा, आगीचे प्रसंगी उपाययोजना, लिफ्ट अपघात प्रसंगी तातडीने करावयाची उपाय योजना याबाबत आधुनिक सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन दल तसेच उदवाहक तज्ञांनी मार्गदर्शन केले.