वाकड, चिखली, चाकण, पिंपरी मधून सात दुचाकी पळवल्या

0
194

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – वाकड मधून चार, चिखली, चाकण, पिंपरी मधून प्रत्येकी एक अशा सात दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाहन चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. चोरीला गेलेली वाहने शोधणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान झाले आहे. सात वाहन चोरीप्रकरणी सोमवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात एकाच दिवशी वाहन चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. दोन बजाज पल्सर, एक पॅशन प्रो, एक बजाज कावासाकी दुचाकी चोरीला गेल्या आहेत. राहुल अनिलकुमार सिंग (वय 25, रा. भूमकर चौक, वाकड) यांची 10 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर, अतुल गोविंदराव माने (वय 37, रा. थेरगाव) यांची 15 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर चोरीला गेली आहे.

विनीत उदय पाटील (रा. काळेवाडी) यांची 25 हजारांची पॅशन प्रो दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. दिनेश ज्ञानदेव जासूद (वय 31, रा. थेरगाव) यांची 10 हजार रुपये किमतीची बजाज कावासाकी दुचाकी चोरीला गेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

अब्दुल रज्जाक खान (वय 38, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 10 हजार रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर दुचाकी चोरीला गेली आहे. अनिल प्रभाकर लहाने (वय 24, रा. तापकीरनगर, आळंदी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लहाने यांची 45 हजार रुपये किमतीची हिरो एच एफ डिलक्स ही दुचाकी चोरीला गेली आहे. तर अपर्णा रुकीराम गौतम (वय 24, रा. मोहननगर, चिंचवड) यांची 20 हजारांची दुचाकी त्यांच्या राहत्या घरापासून चोरीला गेली.

वाहन चोरीच्या बहुतांश घटना रात्रीच्या वेळी होत आहेत. सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरीला जात आहेत. सोसायटीत सुरक्षा रक्षक नेमणे, अलार्म, सीसीटीव्ही बसवणे तसेच चांगल्या प्रतीचे लॉक वाहनांना बसवणे आवश्यक आहे.