Chinchwad

वाकडमध्ये व्यवसायातील तणावातून ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या

By PCB Author

January 08, 2019

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – व्यवसायातील तनाव आणि शरीरक त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुण व्यावसायिकाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास वाकड येथील डायनेस्टी सोसायटीत घडली.

कुशाग्र मनोज कंचन (वय ३०, रा. फ्लॅट क्र. १२०३, डायनेस्टी सोसायटी, वाकड. मुळ रा. झांसी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र वाकड येथील डायनेस्टी सोसायटीतील फ्लॅटमध्ये मित्रांसोबत राहत होता. त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्ट पुरवण्याचा व्यवसाय होता. मात्र त्याला या व्यवसायात नुकसान होत होते. तसेच त्याला शारीरीक आजार देखील होता. या त्रासाला कंटाळून आज सकाळी अकराच्या सुमारास कुशाग्रने वाकड येथील राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये, “माझ्यामुळे तुम्हाला खुप त्रास होतोय. मी तुमच्या गरजा पुर्ण करु शकलो नाही. तुम्ही टेंशन घेऊ नका. मला माफ करा”. आणि ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाखवा, असे लिहिले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.