वाकडमध्ये महिला आणि मुलींवर रंग टाकणाऱ्या ८४ हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0
675

वाकड, दि. २१ (पीसीबी) – धुळवड असल्याचा फायदा घेत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या अनोळख्या तरुणी, महिला आणि मुलींवर पन्नी (पाण्याणी भरलेल्या प्लास्टीकच्या पीशव्या), फुगे, अंडे आणि रंग टाकून त्रास देणाऱ्या तब्बल ८४ हुल्लडबाज तरुणांना वाकड पोलिसांनी आज (गुरुवार) धुळवडी दिवशी ताब्यात घेतले.  

ताब्यात घेण्यात आलेल्या या ८४ तरुणांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना आज दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवले जाणार असून त्यांच्याकडील वाहने देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धळवडीच्या दिवशी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या अनोळखी नागरिकांच्या अंगावर पाणी, रंग आणि फुगे मारुन त्रास देणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिले होते. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आज (गुरुवार) धुळवडीच्या दिवशी ९ पथके तयार करुन वाकड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घातल होते. यावेळी पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालवणे, अनोळखी तरुणी, महिला आणि मुलींवर पन्नी (पाण्याणी भरलेल्या प्लास्टीकच्या पीशव्या), फुगे, अंडे आणि रंग टाकून त्रास देणाऱ्या ८४ जणांना ताब्यात घेतले. या सर्व तरुणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज दिवसभर पोलीस ठाण्यातच ठेवले जाणार आहे.