Chinchwad

वाकडमध्ये भीम आर्मीच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली

By PCB Author

February 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भीम आर्मीच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. म्हातोबानगर, वाकड ते वाकड पोलीस स्टेशन या मार्गे  काढण्यात आलेल्या  कँडलमार्चमध्ये महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला भीम आर्मीचे शहराध्यक्ष अंतिम जाधव, उपाध्यक्ष सुमित वाघमारे, संघटक नितीन सरवदे, सरचिटणीस भैय्यासाहेब गजधने, संघटक वैभव सावंत, महेश ढवळे, अजय भंडारे, संतोष वाहुळे, नितीन पटेकर, सागर लगस, प्रज्ञा जाधव, शैला खरात, शीला साळुंखे, माधुरी गंगावणे, मखमल वाघमारे, रसिका वाहुळे   आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या ,

प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविकेचे वाचन, शपथ घेऊन , मेणबत्ती प्रज्वलन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भैय्यासाहेब गजधने यांनी  आभार मानले.