वाकडमध्ये बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीवर दिली अॅसिड टाकण्याची धमकी

0
704

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणावरुन प्रेयसीने बोलने बंद केले. मात्र प्रियकाराने व्हॉट्सअप आणि टेक्सट मेसेज करुन, ‘तु जर दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर मी तुझ्यावर अॅसिड टाकून तुझी वाट लावीन’, अशी धमकी दिली. ही घटना फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित २७ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जय बाबुराव पाटील (रा. कोपरखैरणे, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय तरुणी आणि आरोपी जय यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र जय तरुणीला त्रास देत असल्याने तिने त्याच्यासोबत बोलने थांबवले. यामुळे चिडलेल्या जय याने व्हॉट्सअप आणि टेक्सट मेसेज करुन, तु जर दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर मी तुझ्यावर अॅसिड टाकून तुझी वाट लावीन, अशी धमकी दिली. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.एल जाधव तपास करत आहेत.