Chinchwad

वाकडमध्ये पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाला अटक

By PCB Author

April 09, 2018

वाकड येथे पोलीसांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणी तुम्हाला गाड्या आडविण्याचा कोणी अधिकार दिला असे सांगून मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करुन अपशब्द वापरणारा व पोलीसांच्या अंगावर धावून जाणाऱ्या एका तरुणाला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.८) रात्री साडेसातच्या सुमार वाकड ब्रीज येथे करण्यात आली.

रिजवान रियाउद्दीन सैय्यद (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शरद विंचु यांनी स्वत: वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.८) रात्री सातच्या सुमारास वाकड ब्रीज येथे वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शरद विंचु हे नाकाबंदी करुन वाहने तपासत होते. त्यावेळी आरोपी रिजवान सैय्यद त्या ठिकाणी आला व पोलीसांना म्हणाला तुम्हाला या गाड्या आडविण्याचा कोणी अधिकार दिला आहे असे सांगून मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करुन अपशब्द वापरुन पोलीसांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे रिजवान विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.