वाकडमध्ये दांडियाच्या कार्यक्रमात तलवारींचा नंगानाच; दोघांना अटक

0
1449

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी नवरात्र मंडळाचा दांडियाचा कार्यक्रम सुरु असताना हातात तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१३ ) रात्री पावनेदहाच्या सुमारास वाकड येथील गेनुभाऊ कलाटेनगरमध्ये असलेल्या जेतवन बुध्दविहाराच्या शेजारील मैदानात घडली.

याप्रकरणी नितीन विजय पटेकर (वय ३१, रा म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भोऱ्या घाडगे, आकाश उर्फ विंचु मकासरे, अशोक तुपेरे, राज कांबळे आणि त्यांच्या इतर दोन ते तिन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भोऱ्या आणि आकाश या दोघांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावनेदहाच्या सुमारास वाकड येथील गेनुभाऊ कलाटेनगरमध्ये असलेल्या जेतवन बुध्दविहाराच्या शेजारील मैदानात वादळ नवरात्र महोत्सव मंडळाचा दांडियाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी भोऱ्या, आकाश, अशोक, राज आणि त्यांचे इतर दोन ते तिन साथीदार तेथे आले. त्यांनी हातात तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाले. याप्रकरणी वाकड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भोऱ्या आणि आकाश या दोघांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक एस.एस.घोळवे तपास करत आहेत.