Chinchwad

वाकडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By PCB Author

May 21, 2019

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.२०) रात्री बाराच्या सुमारास वाकड येथील पुणे-मुंबई सर्विस रोडवरील योगी हॉटेलजवळ घडली.

शिवाजी नारायण जाधव (वय ४९, रा. व्यंकटेश्वरा पार्क, ए/१०४ हिरामण बारणे चाळ, थेरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष नारायाण जाधव (वय ३९, रा. व्यंकटेश्वरा पार्क थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बाराच्या सुमारास वाकड येथील पुणे-मुंबई सर्विस रोडवरील योगी हॉटेलजवळून शिवाजी हे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/१४/डीडी/६५४३) वरुन जात होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.