वाकडमधील सोनाराकडून एकाने नेले सव्वादोन लाखांचे दागिने; पैसे मागितल्यावर दिली धमकी

0
730

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – सोनाराचा विश्वास संपादन करत एका ठगाने आरटीजीएस व्दारे पैसे पाठवतो असे सांगून सोनाराकडून तब्बल २ लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने नेले. मात्र पैसे प्राप्त न झाल्याने सोनाराने त्या ठगाला फोन केला असता त्याने सोनाराला, “माझ्या समोर येवू नका तुमचे रोडवर फिरणे मुश्कील करेन”, अशी धमकी दिली. ही घटना वाकड येथील फोर्च्युन बिजनेस सेंटर येथील गाळा नं.८ या सोन्याच्या दुकानात घडली.

याप्रकरणी सोनार विश्वनाथ बाजीराव पाटणकर (वय ५३, रा.सी/ओ स्वप्नील कस्पेट फ्लॅट नं.२, फोर्च्युन बिजनेस सेंटर, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शेखर देवरे (पूर्ण नाव पत्त प्राप्त नाही) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ यांचे फोर्च्युन बिजनेस सेंटर, कस्पटे वस्ती येथे सोन्याचे दुकान आहे. आरोपी शेखर देवरे याने त्यांच्याकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये २ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बणवून नेले होते. तसेच आरोपी हा विश्वनाथ यांच्या ओळखीचा असल्याने त्याने विश्वनाथ यांना आरटीजीएस व्दारे पैसे पाठवतो असे सांगितले होते. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपी देवरे याने विश्वनाथ यांच्याकडून नेलेले सोन्याचे पैसे दिले नाही. तसेच विश्वनाथ यांनी त्याला फोन केला असता, “ मी तुमचे पैसे दिले आहेत तुम्ही माझ्या समोर येवू नका तुमचे रोडवर फिरणे मुश्कील होईल, देवाकडे प्राथना करा तुम्ही माझ्या समोर लवकर येवू नये”, अशी धमकी दिली आणि आर्थीक फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी शेखर विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबर तपास करत आहेत.