Maharashtra

वसुलीचे टार्गेट देणारा आणखी एक ‘मंत्री’; सचिन वाझेंचा गौप्यस्फोट

By PCB Author

March 24, 2021

मुंबई, दि.24 (पीसीबी) : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याने एनआयए चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असं सचिन वाझे याने मान्य केलं आहे. सचिन वाझेच्या या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे याने या चौकशीत आणखी एका मंत्र्याचं नाव घेतलं आहे आणि त्यांनी आपल्याला मागील वर्षी पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा दावा केला आहे. त्यामुळे सचिन वाझे याच्या दाव्यानुसार, पैसे वसुलीचं टार्गेट देणारा दुसरा नेता कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

दरम्यान, आता तो दुसरा मंत्री कोण याची चर्चा सुरु असून शिवसेनेकडे बोट दाखवीले जात आहे.