Notifications

वल्लभनगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेची आत्महत्या

By PCB Author

December 03, 2018

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका डी फारमसी शिक्षण झालेल्या विवाहितेने ओढणीच्या सहायाने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे विवाहितेला तीन महिन्यांचा मुलगा आहे. ही घटना रविवारी (दि.२) वल्लभनगर येथील तिच्या सासरच्या घरी घडली.