वल्लभनगरमध्ये अल्पवयीन तरुणी बोलत नाही म्हणून तरुणाने दिली बघुन घेण्याची धमकी

0
826

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आपल्या मैत्रीणीसोबत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला रस्त्यात थांबवून, ‘ तु माझ्याशी का बोलत नाहीस, तुला बघुन घेतो’ अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.२) सायंकाळी पावनेपाचच्या सुमारास पिंपरीतील वल्लभनगर एस.टी.स्टँडजवळ घडली.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सचिन रोहिदास म्हस्के (वय २२, रा. नखाते वस्ती रहाटणी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार सायंकाळी पावनेपाचच्या सुमारास पिंपरीतील वल्लभनगर एस.टी.स्टँडजवळून पीडित १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या मैत्रीणीसोबत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी निघाली होती. यावेळी आरोपी रोहिदास म्हस्के याने तरुणीला थांबवून, ‘  तु माझ्याशी का बोलत नाहीस? मी आता येथून जातो पण नंतर तुला बघुन घेतो अशी धमकी देऊन निघून गेला. यावर घाबरलेल्या तरुणीने तिचे काका संतोष यादव यांना फोन करुन बोलवून घेत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने यापूर्वी देखील पीडित तरुणीला पाठलाग केला होता. तसेच त्याच्याशी न बोलल्याच्या रागातून त्याने पीडित तरुणीचे केस ओढून तिच्या गालावर चापट मारुन फरार झाला होता. पोलिसांनी रोहिदास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.