वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0
337
संग्रहित

वर्धा, दि.३ (पीसीबी) –महाविद्यालयात शिक्षिका सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हा प्रकार हिंगणघाट येथे घडला असून फरार आरोपींची शोध पोलिस घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून सकाळी कामावर निघालेल्या तरुणीवर एका व्यक्तीने पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले आणि फरार झाला. पीडित तरुणीचा दिनक्रम माहिती असल्याने आरोपी तिच्या मागावरच असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. दिवसाढवळ्या भरचौकात हा प्रकार घडल्याने चौकातील नागरिकांनाही याचा धक्का बसला. दरम्यान, संबंधीत तरुणीला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. आरोपीने असे कृत्य का केले याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून त्याला ताब्यात घेतल्यानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.