Desh

वरात घेऊन नवरदेव पोहोचला दारात पण नवरीमुलीने दुसऱ्याच मुलासोबत थाटला संसार

By PCB Author

July 10, 2019

उत्तर प्रदेश, दि.१० (पीबीसी) – कशामुळे काय बिघडेल याचा नेम नाही. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशमधील जहागीराबाद तालुक्यात घडली आहे. बॅण्ड आणि फोटोग्राफरशिवाय वरात घेऊन गेलेल्या नवरदेवाला नवरीने तसेच परत पाठवले. इतकेच नाही, तर ऐनवेळी दुसऱ्या मुलाशी संसारही थाटला.

जहागीराबाद तालुक्यातील एका गावातील मुलीचे गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील एका गावातील मुलाशी लग्न होते. रविवारी रात्री ११ वाजता नवरदेव वरातीसह आला. पण, एक गोष्ट सगळ्यानाच खटकली. वरातीसोबत ना बॅण्ड होता ना फोटोग्राफर. त्यात नवरीसाठी आणलेले सामानही कमी निघाले. मग नवरीकडच्या मंडळीमध्ये चर्चा सुरू झाली.

त्यानंतर वधु वराकडील मंडळींची बैठक बोलावली गेली. पण, तोडगा काही निघाला नाही. नवरीची जबाबदारी घेण्याबद्दल पंचानी विचारलेल्या प्रश्नालाही नवरदेवाने उडवाउडवीचे उत्तर दिली त्यामुळे लग्न फिस्कटलं. गावकऱ्यांनी घडलेलल्या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली.  घरच्यांच्या संमतीने मुलीने जवळच्या गावातील दुसऱ्या मुलाला वरमाला घालत संसाराला सुरूवात केली. तर वरात घेऊन आलेला नवरदेव मात्र आला तसाच परत गेला.