वय वाढवून वयाच्या १७ व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो – शेकाप आमदार

0
1183

पंढरपूर, दि. १५ (पीसीबी) – वयाच्या १४ व्या वर्षी राजकाराणात आलो. वय वाढवून वयाच्या १७ व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो, असा गौप्यस्फोट शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. सांगोल्या शेकापच्या मेळाव्यात ते बोलत होते.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा करण्याचा हक्क मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी २१ वर्षे पूर्ण व्हावी लागतात. असे असतानाही शेकापच्या जयंत पाटलांनी वयाच्या १७ व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाले असल्याच कबूल केले आहे.

सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. अनेक नेते भाषणबाजी करत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जातय. दरम्यान, जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे सत्तेसाठी राजकारणी नेते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुन कसा गैरवापर करतात हे स्पष्टपणे सर्वांसमोर आले आहे.