वयाच्या ९७ व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरेंनी बजावला मतदानाचा हक्क

0
688

पुणे, दि. २१ (पीसीबी) – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती येथे मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन  लोकशाही बळकट करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले.

मतदान करणे आपले कर्तव्य  असल्याच्या भावनेने मी आलो आहे. कोणीही माझ्याकडे मतदानासाठी चला म्हणून हट्ट धरला नाही, किंवा जबरदस्ती गाडीत बसवलेले नाही. तसेच कोणीही पैसेदेखील दिलेले नाहीत. मतदान करणे एक प्रकारचा आनंद असतो,  असे  सांगून  त्यांनी लोकांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.

पुढचे पाऊल पुढेच पडले पाहिजे, मग ते कोणतेही क्षेत्र असो. आपण मागे राहता कामा नये. आपण नेहमी पुढे चालत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.  तसेच मेरा भारत महान ट्रकवर लिहीणे पुरते राहू नये, हे संपूर्ण देशासाठी लागू असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.