वयाच्या दहाव्या वर्षीच जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला

0
343
मळवली, दि.२२ (पीसीबी) – वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त, दि.१५ आणि १६ फेब्रुवारी २०२० दरम्यान पोटोबा मंदिर, वडगाव मावळ येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग (लोणावळा) फिटनेस च्या कु. तपस्या अशोक मते, कु.लव महेश भुसारी, कु.सिद्धिविनायक अशोक मते कु.आदित्य देसाई यांनी सहभाग घेतला होता. यापैकी कुमारी तपस्या अशोक मते हिने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच द्वितीय क्रमांक मिळविला.
सदर स्पर्धेतील ती सर्वात लहान खेळाडू म्हणून सर्वांनी तपस्याचे खूप खूप कौतुक केले.