Maharashtra

वडिलांनी जिवंत जाळलेल्या ‘त्या’ मुलीचा अखेर मृत्यू

By PCB Author

January 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – वसई-विरारमध्ये बापाने स्वता: च्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिंवत जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार (दि.३१ डिसेंबर) रोजी घडला होता. या मुलीचा शनिवारी (दि.५) आखेर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शाहीस्ता मूर्तिजा मन्सुरी (वय १६, विरार पूर्व गोपचर पाडा) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल मोहम्मद मूर्तिजा मंसूरी यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मंसूरी याला आपली मुलगी सतत फोनवर बोलत राहते. तसेच तिचे कुणासोबत तरी प्रेमसंबंध आहे, असा संशय होता. या रागातून सोमवार (दि.३१ डिसेंबर) मोहम्मद याने  स्वत:ची मुलगी शाहीस्ता हिला रॉकेल टाकून जिवंत जाळले. शाहीस्ताला आधी विरारच्या रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. ७५ टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती. अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला. मुलीला पेटवून देणारा बाप पोलिसांच्या अटकेत असून, आता या गुन्ह्यात ३०२ हे कलम लावले जाणार आहे.