वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ

0
260

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – आंतरधर्मीय विवाह केलेली मुलगी वडीलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माहेरी गेली असता माहेरच्या लोकांनी तिला आणि तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत नऊ जणांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज ऊर्फ बा दिलावर शेख (वय 41), बशीरा फिरोज शेख (वय 38), जुबेदा सिराज शेख (वय 60), रजिया सलीम शेख (वय 48), फर्जना शाहिद मुलतानी (वय 35), जुबेदा शाहिद मुलतानी (वय 22), चांद सलीम शेख (वय 21), अंजुम सलीम शेख (वय 24), यास्मिन हुसेन सय्यद (वय 50, सर्व रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सनी शंकर पवार (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. 7) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी पवार आणि त्यांची पत्नी अंजली उर्फ शमा नासिर शेख यांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. 13 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या पत्नी त्यांच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दापोडी येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादी यांना फोन करून माहिती दिली. त्यामुळे फिर्यादी पत्नीला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत मारहाण, गर्दी मारामारी, यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.