वडाळ्यातील इमारतील आग; १५ गुदमरले

0
522

मुंबई, दि, २१ (पीसीबी) – वडाळा पूर्व येथील एका इमारतीत आज पहाटे आग भडकली असून यामुळे १५ जण गुदमरल्याची माहिती मिळते आहे. या १५ जणांना केईम रुग्णालयात हलवण्यात आले असून तासाभरातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे

 

वडाळा पुर्व येथील श्री गणेशा साई इमारतीत ,सकाळी साडे तीनच्या सुमारास आग भडकली आगीचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. आग भडकताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे चार अभियंते , रुग्णवाहिका पाण्याचे टॅंकर घेऊन लगेच घटनास्थळी दाखल झाले. पुढच्या २० मिनीटांमध्ये ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले

पहिल्या मजल्यावर अडकलेल्या १५ जणांचा आगीमुळे श्वास कोंडला होता. त्यांना लगेच केईम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असून या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे चारपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली होती. याआधीही अनेकदा मुंबईतील रहिवाशी इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत