वजन कमी करण्यासाठी दिवसभर फक्त टॉमेटोच खायची ही’ लेखिका

0
326

आजकाल काहीजण आपल्या वजनाच्या बाबतील खूपच काटेकोर असतात. थोडस जरी वजन कमी जास्त झालं कि यांना आभाळाएवढं टेंशन येत. यासाठी काहीजण तरूण तरूणी वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग शोधतात. कोणी दिक्षित डाएटचा आधार घेतं तर कोणी दिवेकर डाएटचा. मात्र एका लेखिकेने वजन कमी करण्यासाठी चक्क आपण दिवसभरात फक्त टॉमेटो खायचे असं सांगितलं आहे. तरूणपणी मी टॉमेटो खाऊन डाएट करत होते, दिवसभरात जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा मी फक्त टोमॅटोच खाल्ले आहेत, पण आता मात्र मी सगळे पदार्थ माझ्या आहारात समाविष्ट केले आहेत असं या लेखिकेने सांगितलं आहे. शिवाय व्यायामाकडेही लक्ष देत असल्याचेही तिने सांगितले आहे.हि व्यक्ती दुसरी कोणी नसून अभिनेता आयुष्मान खुरानाची बायको आणि लेखिका असलेली ताहिरा कश्यप- खुराणा आहे. तिने सांगितलं की तरूण असताना तिने एकान्न डाएट स्वीकारलं होतं. म्हणजेच दिवसभरात टोमॅटो किंवा रताळं खाऊन दिवस काढायचा असतो. यासाठी मनाची बरीच तयारी असावी लागते असं ताहिराने म्हटलंय. मात्र या आहारपद्धतीचा आपण त्याग केला असून एकान्न राहण्यापेक्षा सर्व प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा, असे तिचे म्हणणे आहे.

सध्या तरी ताहिरा चंदीगडमधील थंडीचा आनंद लुटतेय. मन:शांतीसाठी ध्यानधारणा, 40 मिनिटे सायकल चालवणे, पायी चालणे असे व्यायाम गरजेचे असतात असं ताहिराचं म्हणते. अलिकडेच तिने अॅरोबिक्स शिकले असून यामुळे चपळ आणि सक्रीय राहायला मदत होते असं ताहिराने म्हटलंय. ताहिरा आपल्या दिवसाची सुरुवात 2 बदाम, 2 आक्रोड, 2 चमचे भिजवलेले तीळ, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा रसापासून करते. याशिवाय जेव्हा ती घरी असते तेव्हा काकडी, कारले, कोथिंबीर, पेरूची पाने , हिरव्या पालेभाज्यांची पाने मिक्सरमध्ये बारीक करून तयार केलेला ज्यूस पिते. यामधून जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर मिळतात असं तिचं म्हणणं आहे.