वकील न्यायालयात ‘काळा कोट’च का परिधान करतात….??

0
654

कोर्ट म्हंटल कि आपल्यासमोर न्यायाधीश, दोन वकील साक्षीदार, गुन्हेगार यांचे चित्र उभं राहते. पण कधी हा प्रश्न पडलाय कि वकील किंवा न्यायाधीश काळा कोटच का घालतात. तर त्यामागे देखील काही करणे आहेत. काही साधी आहे तर काही वैज्ञानिक आहे… चला तर जाणून घेण्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर…

वकिलांनी आजपासून नव्हे तर बर्‍याच वर्षांपूर्वी काळा कोट घातला होता. वकिलांच्या काळ्या कोटचा इतिहास खूप जुना आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे वकिलाला काळा कोट घालणे आवश्यक आहे.

वकील ‘ब्लॅक’ कोट का घालतात?

‘एडवर्ड तिसरा’ यांनी १३२७ मध्ये वकिलीची सुरूवात केली. जरी त्यावेळी न्यायाधीशांसाठी खास पोशाखांची रचना केली गेली होती, पण सुरुवातीला वकिलांच्या वेशभूषेचा रंग काळा नव्हता. वेषभूषेमध्ये बदलावं १६०० नंतर आला. जेव्हा १६३७ मध्ये न्यायाधीश आणि वकील यांना लोकांपेक्षा वेगळे व्हावे यासाठी वेशभूषा घालायची होती तेव्हा वकिलांच्या वेषात बदल झाले. तसेच, जेव्हा राणी मेरीचा १६९४ मध्ये आजाराने मृत्यू झाला तेव्हा त्यांचा नवरा किंग विल्यम्स यांनी राणीच्या दुखवट्या वेळी सर्व न्यायाधीश आणि वकील यांना ब्लॅक गाउन घालण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर काळ्या रंगाचा कोट घालण्याची प्रथा सुरु झाली जी आजही सुरू आहे.

सन १९६१ मध्ये भारतातील वकिलांशी संबंधित काही नियम बनविण्यात आले होते, त्याअंतर्गत वकिलांना काळ्या रंगाचा कोट घालणे बंधनकारक करण्यात आले होते, त्यानंतर भारतातील सर्व वकील फक्त काळा कोट घालून खटला लढतात. याशिवाय काळ्या रंगाचा कोट हे शिस्त आणि वकिलांमधील आत्मविश्वास यांचे प्रतीक मानले जाते. हा ड्रेस वकिलांना एक वेगळी ओळख देतो.

भारतात हा नियम १९६१ साली बनविण्यात आला होता, परंतु बाहेरच्या देशांचा ‘काळ्या कोटांचा’ इतिहास खूप आधीपासूनच आहे. जेव्हा इंग्लंडचा राजा चार्ल्स यांचे निधन झाले, तेव्हा सर्व वकीलांनी त्याच्या शोकसभेला काळे कपडे घातले होते. यानंतर परदेशातही वकिलांना काळा कोट घालणे बंधनकारक करण्यात आले.

शिवाय या यामागील वैज्ञानिक कारण हे आहे कि, जेव्हा वकील कोर्टात वाद घालतात तेव्हा त्यांना घाम येण्याची शक्यकयता नाकारता येत नाही. काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून काळा कोट वकीलच्या शरीरातून उत्सर्जित होणारी उष्णता शोषण्यास मदत करते. काळा कोट परिधान केल्याने वकिलांची उष्णता आणि सहनशीलता वाढते. काळा रंग हा आज्ञाधारकतेच प्रतीक आहे. त्यासह काळा रंग शक्ती आणि अधिकार यांचे प्रतीक मानला जातो. इंग्लंडमध्ये काळा रंग हा कोणत्याही पेशासाठी खूपच प्रभावी आणि लोकप्रिय मानला जातो. म्हणूनच, बऱ्याच विशेष सभांमध्ये मोठे अधिकारी काळ्या रंगाचा पोशाख परिधान करतात.

काळा रंग अंधत्वाचे प्रतीक आहे, म्हणून कायदा अंध मानला जातो. म्हणून ‘कानून अंधा होता है’ असं म्हणतात. कारण, आंधळा माणूस कधीही पक्षपात करु शकत नाही, म्हणून वकील काळ्या रंगाचा कोट घालतात. जेणेकरुन ते देखील पक्षपात न करता सत्यासाठी लढा देऊ शकतील. जेणेकरून कोर्टमध्ये सत्य जिंकू शकेल.

तर आता आपल्याला हे माहित असलेच पाहिजे की वकील काळे कोट का घालतात, त्याचा इतिहास खूप जुना आहे जो शतकानुशतके चालू आहे, येथे आम्ही काही प्रमुख कारणे देखील सामायिक केली आहेत ज्यामुळे आपल्याला ते समजणे सोपे झाले आहे. भारतात अ‍ॅडव्होकेटला काळ्या रंगाचा पोशाख घालणे बंधनकारक होते, परंतु परदेशात वकिलांना गेल्या काही काळापासून काळा कोट परिधान केला जातो.