Maharashtra

“वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते”

By PCB Author

February 17, 2020

नाशिक,दि.१७(पीसीबी) – महाराष्ट्र गोवा बार काउंसिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वकिल परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, कोर्टात एखादे वकिल मोठ्याने बोलतात तर कोणी हळू बोलतं. मात्र सिनेमात जशी मजा दाखवली जाते तशी मला कोर्टात दिसली नाही. सत्य बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करतो तोच मोठा वकील.

दरम्यान, देशातील काही भागामध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात चिडफाड होत आहे. ते गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी लोकांना त्रास होत आहे. सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.