वंचित बहुजन आघाडीच्या ४८ जागा निवडून येतील – प्रकाश आंबेडकर    

0
476

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या  सर्वच्या सर्व ४८ जागा निवडून येऊ  शकतात,  असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना  व्यक्त केला.  एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

केंद्रात बिगर भाजप-बिगर काँग्रेस सरकार येईल. विरोधक एकत्र राहतील का, ही त्याची परीक्षा आहे. ते एकत्र राहिले, तर एनडीएला कठीण जाईल.  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस फुटण्याची शक्यता आहे, असेही  आंबेडकरांनी यावेळी  सांगितले.  निवडणुकीनंतर आम्ही सेक्युलर पक्षांबरोबर राहू. केसीआर आणि देवेगौडा हे नेतृत्व करण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ४० जागांवर भाजपला फटका बसेल. पश्चिम बंगाल मध्ये भाजप एक आकडी जागांवर येईल, असे प्रकाश आंबेडकरांनी यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलवर  बोलण्यास नकार देत आंबेडकर म्हणाले की, ईव्हीएम हॅक होऊ शकतात, मी ते नाकारत नाही. मात्र,  आमच्या राज्यात ४८ जागा येऊ शकतात.