मुंबई, दि. १५ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी ३७ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (दि. १५) जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीने ३७ उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांच्या नावासमोर ते कोणत्या जातीचे आहेत, याचा उल्लेख करण्यात आला आहे. या यादीत सर्वाधिक ६ धनगर समाजाच्या उमेदवारांसह २१ वेगवेगळ्या जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.पहिल्या यादीत भारिप व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
उमेदवारांची नावे –
१) धनराज वंजारी –वर्धा (वंजारी समाज)
२) किरण रोडगे –रामटेक (बौद्ध)
३) एन. के. नान्हे – भडांरा-गोंदिया (धिवर समाज)
४) रमेश गजबे –गडचिरोली-चिमूर (माना आदिवासी)
५) राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर (माळी)
६) प्रवीण पवार –यवतमाळ-वाशीम (बंजारा)
७) बळीराम सिरस्कार –बुलढाणा (माळी)
८) गुवणंत देवपारे-अमरावती (बौद्ध)
९) मोहन राठोड-हिंगोली (बंजारा)
१०) प्रा. यशपाल भिंगे-नांदेड (धनगर)
११) आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी (मुस्लिम)
१२) प्रा. विष्णू जाधव-बीड (कैकाडी)
१३) अर्जुन सलगर-उस्मानाबाद (धनगर)
१४) राम गारकर-लातूर (मातंग)
१५) अजंली बावीस्कर-जळगाव (शिंपी)
१६) नितीन कांडेलकर-रावेर (कोळी)
१७) डॉ. शरदचंद्र वानखेडे-जालना (विश्वकर्मा)
१८) सुमन कोळी-रायगड (कोळी)
१९) अनिल जाधव-पुणे (वडार)
२०) नवनाथ पडळकर-बारामती (धनगर)
२१) अॅड. विजय मोरे-माढा (धनगर)
२२) जयसिंग शेंडगे-सांगली (धनगर)
२३) सहदेव एवळे-सातारा (होलार)
२४) मारूती जोशी-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कुणबी)
२५) डॉ. अरूणा माळी-कोल्हापूर (लिंगायत)
२६) अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले (मुस्लिम)
२७) दाजमल गजमल मोरे-नंदुरबार (भिल्ल)
२८) बापू बर्डे-दिंडोरी (भिल्ल)
२९) पवन पवार-नाशिक (बौद्ध)
३०) सुरेश पडवी-पालघर (वारली)
३१) डॉ. ए. डी. सावंत-भिवंडी (कुणबी)
३२) मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे (धनगर)
३३) डॉ. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण
३४) डॉ. संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
३५) संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई (मराठा)
३६) राजाराम पाटील-मावळ (आगरी)
३७) डॉ. अरूण साबळे-शिर्डी (बौद्ध)