वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0
375

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी ३७ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (दि. १५) जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीने ३७ उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांच्या नावासमोर ते कोणत्या जातीचे आहेत, याचा उल्लेख करण्यात आला आहे. या यादीत सर्वाधिक ६ धनगर समाजाच्या उमेदवारांसह २१ वेगवेगळ्या जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.पहिल्या यादीत भारिप व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.