लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू आढळल्याने खळबळ

0
446

पुणे, दि. १४ (पीसीबी) – लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात आज (मंगळवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. हे सदृश्य स्फोटक बॉम्बशोधक व नाशक पथकाने नष्ट केले आहे. यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मुले खेळत होती़. यावेळी तेथील मुलांना सदृश्य स्फोटक वस्तू आढळून आली़. त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली़. शिक्षकांना ती वस्तू हँड ग्रेनेड सदृश्य वाटल्याने त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांना कळविले़. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली़. हे पथक तातडीने घटनास्थळी गेले़ ती वस्तू पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी तो हँड ग्रेनेड असल्याचे वाटले़. हँड ग्रेनेड हा लोखंडी असतो़ तो प्लास्टिकचा होता़. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू निकामी केली़.

दरम्यान, निकामी केलेली ही वस्तू दिवाळीतील फटाक्याच्या दारु भरलेली प्लॉस्टिकची वस्तू होती़. त्याचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ त्याच्या तपासणीनंतरच ती वस्तू नेमकी काय होती हे समजून येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली आहे.