Pune Gramin

लोणावळ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

August 07, 2018

लोणावळा, दि. ७ (पीसीबी) – एका ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरातील छताला साडीच्या किनारीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.६) लोणावळ्यातील भुशी रामनगर येथे घडली.

लक्ष्मण देवजी पालवे (वय ६५, रा.  भुशी, रामनगर, लोणावळा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी लोणावळ्यातील रामनगर येथे राहणाऱ्या लक्ष्मण  पालवे या वृध्द व्यक्तीने राहत्या घराच्या छताला साडीच्या किनारीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.बी.मुंडे तपास करत आहेत.