Pune Gramin

लोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला

By PCB Author

December 11, 2018

लोणावळा, दि. ११ (पीसीबी) – लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात आज (मंगळवार) दुपारी दोनच्या सुमारास एक तरुण बुडाला.

साद घिवाला (वय २३, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबईहून सहाजण लोणावळ्यातील तुंगार्ली धरण परिसरात फिरायला आले होते. यावेळी साद हा तुंगार्ली तलावात पोहण्यासाठी उतरला होता. तो पोहत असताना धरणात बुडाला. घटनेची माहिती लोणावळा पोलीसांना देण्यात आली असून शिवदुर्ग रेस्क्यू टीम तुंगार्ली धरणाजवळ पोहचले आहेत. सादला शोधण्याचे काम सुरु आहे.