लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू

0
387

लोणावळा, दि. १६ (पीसीबी) – कुमार रिसॉर्ट येथे मुंबईती आश्रमशाळेतील १७ वर्षीय विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१५) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

नीलून महेश म्हेत्रे (वय १७, रा. अंधेरी इस्ट) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट येथे मुंबईतील स्नेब सदन संस्थेच्या ८७ विद्यार्थीनी या पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी नीलू वॉटर पार्कशेजारी उभी होती. तिला खेळता खेळता धक्का लागला आणि ती पाण्यात बुडाली. पाण्यात बुडाल्याचे समजताच तिला काही जणांनी बाहेर काढले. तसेच तिला जवळील रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.