लोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी

0
803

लोणावळा, दि. १८ (पीसीबी) – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसली. या अपघातात एक चालक जखमी झाला आहे. हा अपघात आज (शनिवारी) सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक कंटेनर भरधाव जात होता. महामार्गावर अमृतांजन पुलानजदीक आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोर जाणाऱ्या इनोव्हा गाडीला धडक दिली. त्यामुळे इनोव्हा गाडीने समोरून जाणाऱ्या बीएमडब्लू कारला धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने आणखी एका कंटेनरला धडकला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली. अपघातामुळे काहीकाळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस तपास करत आहेत.