Pune Gramin

लोणावळ्याजवळील वरसोलीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग

By PCB Author

December 19, 2018

लोणावळा, दि. १९ (पीसीबी) – लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला आज (बुधवारी) दुपारी सव्वाचारच्या सुमारास भीषण आग लागली.

या आगीत भंगार गोदामासह परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचे लोट व धुरांचे डोंब हवेत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आयआरबी आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आग पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.  दरम्यान, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे.