लोखंडी पत्र्यामध्ये करंट आल्याने पत्र्याला धक्का लागून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
286

पिंपरी, दि. 4 (पीसीबी): घराच्या लोखंडी पत्र्यामध्ये करंट आल्याने पत्र्याला धक्का लागून एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी, दि.4) सकाळी अकराच्या सुमारास अशोकनगर, ताथवडे येथे घडली.
मयूर बाळू थोरात (वय 17, रा. अशोक नगर, ताथवडे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील अशोकनगर मधील एका पत्र्याला विजेच्या तारेचा करंट आला. करंट असलेल्या पत्र्याला घरात राहत असलेल्या मयूरचा हात लागला. त्यात मयूर गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिकांनी मयूरला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत मयूरचा भाऊ तुषार बाळू थोरात यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.