Maharashtra

लोकांना रस्त्यावर बोलवून बीजेपी मरकज २.० घडवू इच्छित आहे का?

By PCB Author

April 06, 2020

 

मुंबई, दि.६ (पीसीबी) – लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले.

यासोबतच, आज ५ एप्रिलला, जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावे म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते ज्यात ते लोकांना यात रस्त्यावर येऊन सहभागी व्हावं असे म्हणाले . आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावर टीका केली आहे. ते ट्वीटर वर म्हणाले,

लोकांना रस्त्यावर येण्यास सांगत विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा जोरदार निषेध. यापूर्वी मोदीजींनी थाली बाजो यांना बोलाविल्यामुळे अनेक बीजेपी अनुयायी रस्त्यावर आले आणि त्यांनी सामाजिक अंतराची थट्टा केली. बीजेपी मरकज २.० बनवू इच्छित आहे का? भाजपकडून बिनशर्त माफीची मागणी करतो.

Strongly condemn irresponsible statement from LOP asking people to come on streets. On earlier call of Modi ji to thali bajao many bjp followers came on street and made mockery of social distancing. Does bjp want to make Markaj 2.0?
We demand unconditional apology from BJP. pic.twitter.com/KsWaYHFFEt

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 5, 2020