Notifications

लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार?; एकत्र निवडणूक घेण्याचा भाजप नेतृत्वाचा विचार

By PCB Author

October 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजपचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकाही एकत्र घेण्याच्या विचारात असल्याचे समजते. या दोन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या दोन्ही राज्यात सत्ताविरोधी रोष वाढला आहे. त्यामुळे लोकसभेसोबत विधानसभांच्या एकत्र निवडणुका झाल्यास दोन्ही राज्यांत भाजपला सत्तेत परतण्याची संधी असल्याचा पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.