Pune

लोकसभेसाठी साखरपेरणी; संजय काकडेंनी अजित पवारांची घेतली भेट

By PCB Author

February 11, 2019

पुणे, दि. ११ (पीसीबी) –  भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी  राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (सोमवार)  भेट घेऊन लोकसभेसाठी मदतीचा हात मागितला. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पुणे भाजपने माझा नुसता वापर केला, असा आरोप करून आगामी लोकसभा निवडणुकीत मदत मागण्यासाठीच  अजित पवारांची भेट घेतल्याचे काकडे यांनी यावेळी  स्पष्ट केले. तसेच  अजितदादांनीही मदतीचा शब्द दिला आहे, असे काकडे यांनी सांगितले.

अजितदादा हे साधे आमदार होते, तेव्हा मी छोटा बिल्डर होतो, तेव्हापासून आमचे संबंध आहेत. अजितदादा माझ्यावर नाराज   नसल्याचे या भेटीतून दिसून आले, असेही काकडे यांनी यावेळी सांगितले.