लोकसभेपेक्षा विधानसभेचे आव्हान तगडे; बारामतीत तळ ठोकणार – चंद्रकांत पाटील

0
402

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  बारामतीत लोकसभेपेक्षा विधानसभेचे आव्हान तगडे आहे. या मतदारसंघात पक्ष बांधणीवर लक्ष दिले गेले नव्हते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या  तयारीसाठी  पुढील काही महिने बारामतीमध्ये तळ ठोकणार आहे, असे भाजप नेते व  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर  विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी आपण स्वतः बारामतीला  सारखे  जाऊन पक्षाचा विस्तार व ताकद वाढविण्याकडे लक्ष देणार आहे. त्यादृष्टीने  कामाला सुरूवात  करणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.बारामतीतील भाड्याचे घर केवळ लोकसभेपुरते नव्हते. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे हे घर माझ्या करीता कायम राहणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व दहा जागा जिंकण्याची जबाबदारी पक्षाने पाटील यांच्याकडे दिली होती. निवडणुकीच्या काही दिवस आधी पाटील यांनी बारामतीत दोन खोल्यांचे भाड्याने घर घेतले होते. या घरातूनच पाटील यांनी सर्व सुत्रे हलवली होती.