Desh

लोकसभेच्या ६५ आणि राज्यसभेच्या २९ खासदारांनी संपत्तीची माहिती लपवली

By PCB Author

September 04, 2018

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – लोकसभेचे ६५ खासदार आणि राज्यसभेच्या २९ खासदारांनी आतापर्यंत आपली संपत्ती किंवा कर्जाची घोषणा केलेली नसल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत समोर आली आहे. लोकसभेतील ६१ खासदारांनी २०१४ पासून आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही. यामध्ये ४ जण पोटनिवडणुकीत निवडून आलेले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्त्या रचना कालरा यांनी ही माहिती मागितली होती. यातील ४ खासदार हे काँग्रेस तर ७ जण हे टीडीपीचे खासदार आहेत. तर तृणमूल काँग्रेस, बिजद, भाजपा, सपा, टीआरएस आणि एलजेएसपीसारख्या पक्षांचे ४-४ खासदार आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही.

तर आपचे ३, शिवसेना आणि आरजेडी, अकाली दल, जेडीयू आणि जेएमएमच्या २-२ खासदारांचा यात समावेश आहे. एआयडीएमके, वायएसआर, आयएएलडी, एनपीपी, एनसीपी, एनडीपीपी आणि इतर पक्षातील १-१ खासदारांचाही यात समावेश आहे.