लोकसभा लढविण्याविषयी करिना कपूरने केला मोठा खुलासा

0
1290

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – चित्रपट हेच माझे ध्येय  असून  केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे. मी निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे. मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही, असा खुलासा  बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने केला आहे.

राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे,  असे स्पष्ट करून  करिनाने काँग्रेसकडून भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून  आहे. त्यामुळे  जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो.  महिलांची ही तिला पाठिंबा मिळेल,  त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती.  मात्र, आता  करिनानेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.