लोकसभा लढवण्याबाबत प्रियंका गांधींचा मोठा खुलासा

0
476

लखनौ, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी  यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात पक्षबांधणीवर भर देऊन २०२२ मधील विधानसभा निवडणुका जिंकण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे,  असे प्रियांका गांधी यांनी  सांगितले.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या रायबरेली मतदारसंघातून   लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे रायबरेली मतदारसंघातून   प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सोनिया गांधी पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे.

प्रियांकांनी लखनौ आणि फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. रिता बहुगुणा जोशी  भाजपमध्ये गेल्यानंतर लखनौमध्ये काँग्रेसकडे प्रबळ दावेदार नाही.  फुलपूरच्या जागेवरुन जवाहरलाल नेहरु काँग्रेसची जागा लढवत होते. या जागेवरून प्रियंका यांनी निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांतून होत होती. मात्र, प्रियंका यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.