लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपच्या ‘या’ स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार

0
718

मुंबई,  दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या ४१ स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द  करण्यात आली आहे.  रविवारी (दि. २४)  कोल्हापुरात युतीच्या संयुक्त प्रचाराचा   शुभारंभ  करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरात  स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत.  

स्टार प्रचारकांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसे या नेत्यांना  स्थान देण्यात आले आहे. तर उत्तर भारतीय मतांसाठी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत.

या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहानवाज हुसेन, पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, मुक्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी या केंद्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे.

तसेच राज्यातील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांचा समावेश असणार आहे.