लोकसभा निवडणूक एक्झिट पोल; महाराष्ट्रात युतीला ३४, तर आघाडीला १४ जागा मिळणार

0
504

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (रविवार) पार पडली. मतदानानंतर वेगवेगळ्या संस्थांचा  एक्झिट पोल  प्रसिध्द झाला आहे. एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलनुसार युतीला राज्यात  ३४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त  केला आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला १४ जागा मिळतील.  युतीला ७ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी   कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे  गुरूवारी (दि.२३) स्पष्ट होईल. मात्र एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना १७, भाजप-१७, काँग्रेस-४, राष्ट्रवादी- ९ आणि स्वाभिमानीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीने रिंगणात  उतरून चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  मात्र,  वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत  खातेही खोलता येणार  नसल्याचे एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलमधून समोर येत आहे.

लोकसभेच्या निवडणूक २०१४ शी एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलची तुलना केली, तर भाजपला ६ जागांचा तर शिवसेनेला १ जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादीच्या ५ जागा वाढण्याची शक्यता आहे.

एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलच्या आकडेवारी

शिवसेना -१७

भाजप -१७

काँग्रेस -४

राष्ट्रवादी – ९

स्वाभिमानी शेतकरी संघटना -१

लोकसभा निवडणूक २०१४ निकाल

शिवसेना – १८

भाजप – २३

काँग्रेस – २

राष्ट्रवादी -४

स्वाभिमानी शेतकरी संघटना – १