लोकसभा निवडणूक एक्झिट पोल; केंद्रात पुन्हा मोदी सरकार

0
538

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. त्यानंतर सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले.  भाजपाप्रणित ‘रालोआ’ पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होईल, असे सर्वच एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार ५४२ पैकी भाजपाप्रणित एनडीएला ३०६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेसप्रणित यूपीएला १३२ जागा मिळतील. तर एबीपी – नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाप्रणित एनडीएला २६७, काँग्रेसप्रणित यूपीएला १२७, सपा- बसपाला ५६ आणि अन्य पक्षांना ८४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज

> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७

रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०

एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)