Maharashtra

लोकसभा निवडणूक आवाहन याचिकेत मोचीजातीचे मूळ कागदपत्रे न्यायालय समक्ष सादर करण्याचे नवनीत राणा व याचिकाकर्त्यांना न्यायालयाचे आदेश…!

By PCB Author

January 10, 2021

नागपूर,दि.१०(पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठा मध्ये खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध दाखल दोन निवडणूक याचिकांमध्ये झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना व श्रीमती राणा यांना मोची जाती चे प्रमाणपत्र मिळविताना दाखल केलेले मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

श्रीमती खा.राणा यांच्या निवडणूकेला आव्हान देणाऱ्या दोन वेगवेगळ्या निवडणूक याचिका माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी सादर केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आवाहन देतांना प्रमुख मुद्दा असा आहे की खोटे शपथपत्र व कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक लढविली आहे.

या याचिकेमुळे. दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरना द्वारे व जात वैधता प्रमाणपत्र समितीद्वारे वैध ठरवू दिले असले तरी याचिकाकर्त्यांच्या याचिकेत सादर करण्यात आलेली मूळ कागदपत्रे न्यायालया समक्ष प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी असे आदेश दिले आहेत.

आज रोजी श्रीमती नवनीत राणा यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातील मा. न्यायमूर्ती झेड. ए.हक यांच्या समक्ष सुनावणी झाली सुनावणीअंती राणा यां चे दोन्ही आषेप अर्ज मा. न्यायमूर्तीनी फेटाळले. खा .नवनीत राणा यांना त्यां अनुसूचित जातीच्या असल्याचे न्यायालयातच सिद्ध करावे लागेल व निवडणूक योग्य असल्याबाबत निर्णायक पुरावा द्यावा लागेल. वरील दोन्ही निवडणूक याचिकांमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांचे तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आड. प्रमोद पाटील व त्यांचे सहकारी एड. सचिन थोरात मुंबई आणि एड.राघव कविमंडन यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.विरुद्ध पक्षाच्यावतीने अड.जीया काझी नागपूर यांनी आपले म्हणणे मांडले.