Maharashtra

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवधनुष्य प्रशांत किशोरकडे !

By PCB Author

February 05, 2019

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने निवडणूक प्रचार रणनीतीकार   प्रशांत किशोर यांच्याकडे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचे शिवधनुष्य सोपविले आहे.

किशोर यांना आज (मंगळवार) ‘मातोश्री’वर निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रशांत किशोर यांनी  निवडणुकीतील रणनीतीबाबत महत्त्वाची चर्चा केली.

त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर घवघवीत यश मिळवून दिले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांच्याकडे  जेडीयूचे उपाध्यक्षपद  देण्यात आले आहे.