Chinchwad

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी

By PCB Author

April 02, 2019

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस आणि निवडणुक अधिकारी सज्ज झाले असून त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करायला सुरुवात केली आहे.

निवडणुकी दरम्यान गुंडांच्या सहाय्याने घातक हत्यारे बाळगून मतदारांवर दहशत बसवण्यात येते. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारु, पैसे या सारख्या प्रलोभनाचा लालुच दाखवण्यात येते. या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच असे प्रकार हाणून पाडण्यासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस दलातील कर्मचारी संयुक्तरित्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करताना दिसत आहेत. आज (मंगळवार) चिंचवड येथील केएसबी चौकात वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.