Desh

लोकसभा निवडणुकीची घोषणा ८ मार्चला होण्याची शक्यता

By PCB Author

March 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. तरीही आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेवरच होणार आहे. १६व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ मार्चनंतर कधीही होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे.

आयुक्त अरोरा यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक तयारीचा  आढावा घेतला त्यानंतर  ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक ठरल्या वेळेनुसारच होणार  आहे, असे स्पष्ट केले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे लोकसभा निवडणूक लांबणीवर जाण्याची सुरू झाली होती. मात्र, आयुक्त अरोरा यांनी निवडणूक ठरलेल्या वेळेवर होईल, असे स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ ते १० मार्चदरम्यान कधीही होऊ शकते, असे म्हटले जात आहे.  तर सूत्रांच्या मते ८ मार्चला घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.